डीएमसी अधिकारी - MH
दि. १४/०३/२०२४ गुरुवार रोजी DMC आपत्ती व्यवस्थापन पथकांमध्ये महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पथकास सन्मानपत्र देण्यात आले. संचालक तथा प्रमुख मार्गदर्शन डॉ. महेश चव्हाण सर, DO - प्रज्वल गावंडे सर, ADO - पार्थ हागे सर, STO - मोहण पारधी सर, ASTO - शंकर लाखकर सर, DMC - कमलेश भुरे, CRO - कौस्तुभ गावंडे उपस्थित होते.
जागतिक महिला दिनानिमित्त मोफत रक्त तपासणी शिबिर
कारंजा (मानोरा): जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. महेश चव्हाण मित्र मंडळ, कारंजा-मानोरा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ, ता. मानोरा अंतर्गत लोक संचालित साधन केंद्र पोहरादेवी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ मार्च २०२४ रोजी भव्य मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
महेश्वरी भवन, दिग्रस रोड, मानोरा येथे दुपारी १२ ते ४ या वेळेत शिबिर पार पडले. गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत रक्त तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे शिबिर घेण्यात आले.
शिबिरात हिमोग्लोबिन तपासणी, डायबिटीज तपासणी, थायरॉईडची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यानी केली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ महेश चव्हाण, प्रमुख मार्गदर्शक डॉ निकिता महेश चव्हाण, कुसुम रुपने मॅडम (माविम व्यवस्थापक), किरण ताई पदमगिरवर (पोलीस दक्षता समिती अध्यक्ष), सुमित्राताई दातिर (अध्यक्षा पोहरादेवी), सौ. मंदाताई राठोड , गणवीर मॅडम, शीतल गजगणे, अमोल राऊत (लिपिक मावीम) आणि नितेशभाऊ लवटे, तलवारे भाऊ यांची उपस्थिती होती.
या शिबिरात मोठ्या संख्येने रुग्णांनी सहभाग घेतला आणि मोफत रक्त तपासणीचा लाभ घेतला.

